Edition

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Pune Crime : ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद

ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद
ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद

 

Pune Crime News 19/May/2024:ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद 

Pune दि.१८/०५/२०२४ रोजी दुपारी १२.१० वा. चे सुमारास BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी मध्ये तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, लोखंडी रॉड व स्प्रे याचा धाक दाखवून दुकानातील अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचेतयार सोन्याचे दागीने चोरी करुन पळून गेले होते त्याप्रमाणे गुन्हा वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर३५०/२०२४ भादंविक ३९५, ३९७, ३९८, भारतीय हत्यार कायदा ३(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा झाला होता. मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर यांच्या सुचनेप्रमाणे व मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ व २ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट ४, ५, ६, खंडणी विरोधी पथक १ व २, दरोडा व वाहन चोरी पथक २ कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची १० पथके तयार करून समांतर तपास करण्यास आदेशीत केले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर तपासाचे दरम्यान मिळालेल्या गोपनीय बातमीदारांचे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा नमुद आरोपीतांनी केला असल्याच्या बातमीवरून आरोपी नामे १) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, रा. ए.आर.ए.आय. रोड, वसंतनगर, खडेकश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड, पुणे २) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे, वय १९ वर्षे रा. सदर ३) पियुष कल्पेश केदारी, वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३, जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा, पुणे ४) ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर, वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरुड, पुणे ५) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, वय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज, पुणे ६) मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्षे, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लॅट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी, पुणे ७) नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारवाडा, वानवडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी इतर ०३ साथीदार यांच्या मदतीने महंमदवाडी येथील BJS ज्वेलर्स दुकानात जावुन दुकानात असलेल्या व्यक्तींना चाकु व रिव्हॉल्वरची भिती दाखवुन त्यांना मारहाण करुन त्यांचे दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन आणलेले आहे असे सांगितले.सदर ताब्यात घेतलेल्या इसमांकडून ६०१.१५ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी व ६ मोबाईल असा एकूण ४८,३०,९१०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्तम कामगिरी केलेली आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

1 thought on “Pune Crime : ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणा-या टोळीला १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने केले जेरबंद”

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool