Pune Crime News 20 / May /2024 : प्रेयसीची भेट झाली नाही म्हणून प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार केला आहे.
माथेफिरू प्रियकराने प्रियसीची भेट झाली नाही म्हणून प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पहाटे दोन वाजता एका मित्राबरोबर प्रेयसीच्या गंज पेठेतील घरात आला. यावेळी त्याने प्रेयसीला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती घरी नसल्यामुळे तक्रारदार तरुणी आणि तिची आणखी एक मावस बहिण घरात होत्या. या दोघींनी आरोपी ऋषीला त्यांची बहीण घरात नसल्याचं सांगितलं. यावर त्याने या दोघींनी तिला फोन करायला सांगितलं. परंतु तिच्याशी संपर्क न झाल्यामुळे रागवलेल्या ऋषीने थेट तक्रारदार तरुणीवर बंदुकीतील गोळ्या झाडल्या.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार करण्याऱ्या आरोपीचं नाव ऋषी सुनील बागूल असं आहे. या आरोपीच्या गोळीबारात प्रेयसीची बहीण जखमी झाली आहे. धक्कादायक घटना गंज पेठेत पहाटेच्या वेळी घडली आहे. तर आरोपी ऋषीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या गोळीबारात तक्रारदार तरणीच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली.खडक पोलिसांनी (Khadak Police) आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.
Author: Star India News Live
BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या