Search
Close this search box.

Pune Crime News:समलिंगी असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर आत्याचार, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा

Pune Crime News:समलैंगिक असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर आत्याचार,अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Pune Crime News:समलैंगिक असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर आत्याचार,अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
Pune Crime News:समलिंगी असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर आत्याचार,अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा

 

Pune Crime News 16/Sep/2024:समलिंगी असल्याचे सांगून निरीक्षण गृहात मुलीवर आत्याचार, केल्याची घटना घडली आहे.

बाल न्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आलेल्या मुलीला अश्लील चाळे करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या अधिपरिचारिकेविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मुलीला, ती समलिंगी असल्याचे ठसवून धमकावण्यात आले.याबाबत जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षणगृहात दाखल करण्यात आलेल्या मुलींवर अधिपरिचारिकेकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे ११ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तक्रारीनंतर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली. समितीत तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.

समितीचे सदस्य निरीक्षणगृहात गेले. एका १६ वर्षीय मुलीकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी, ‘तू समलिंगी आहेस. संस्थेतील अन्य मुलींशी संबंध ठेव,’ असे अधिपरिचारिकेने धमकावल्याचे तिने समितीला सांगितले. ‘मला धमकावून बळजबरी केली, तसेच अश्लील कृत्य केले,’ असेही मुलगी म्हणाली. चौकशी समितीने याची गंभीर दखल घेऊन अधिपरिचारिकेविरुद्ध तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) आणि भारतीय न्यायसंहितेचे कलम ७४, ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool