Search
Close this search box.

Pune Crime News | जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून अल्पवयिन मुलीवर आत्याचार

Pune Crime News | जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून अल्पवयिन मुलीवर आत्याचार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Pune Crime News | जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून अल्पवयिन मुलीवर आत्याचार
Pune Crime News | जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून अल्पवयिन मुलीवर आत्याचार

Pune Crime News | 05 /Nov/ 2024:जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून अत्याचार करत बहिणीच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो पाठवून नाहक बदनामी केल्याचा प्रकार भारती विद्यापिठ पोलीस ठाण्याच्या हाद्दीत घडला आहे.प्रवासात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयिन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला माञ पिडीत मुलीने त्याला नकार दिल्याने मनात राग धरून पिडीत मुलीच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावरुन तिची बदनामी केली व तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र टाकून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची ट्रव्हल्समध्ये ओळख झाली. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढविली. २ महिन्यांनंतर तिला प्रपोज केले. परंतु त्याला तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्याच्यावर ३०० रुपयांमध्ये नाईट फुल असे लिहून त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीकडे ५ हजार रुपयांची मागणी करु लागला. तिच्या घरी येऊन गेला. तेथे तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घातले. दोघेच घरात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची इच्छा नसतानाही वारंवार तिच्याशी शरीर संबंध ठेवत होता.फिर्यादी या बहिणीकडे गेल्या असताना आरोपीने तिच्या बहिणीला फोन करुन तिला माझ्याकडे पाठव नाही तर मी तिचे अश्लिल फोटो इंन्स्टाग्रामवर व्हायरल करेल, अशी वारंवार धमकी दिली. बनावट इन्स्टाग्रामवरील फोटो बहिणीच्या इन्स्टाग्रामवर पाठवून फिर्यादीची बदनामी केली. बहिणीचा मोबाईल नंबर टाकून मी आत्महत्या करतो, अशी सुसाईड नोट लिहून तो फोटो इन्स्टग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणावर पोक्सोसहीत विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ पासून १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरु होता.आशी माहीती पोलीसांनी दिली आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool