
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले १० ते १५ टन वजनी चंदन पकडले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे मालमत्ता विरोधी पथकाने तात्काळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सापळा रचला. संशयास्पद कंटेनर दिसताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला वाहनचालक आणि तस्करांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनर उघडून पाहताच मोठ्या प्रमाणावर चंदन लपवून ठेवलेले आढळले.https://youtu.be/z4pHn_ltbaM
कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची तस्करी पोलिसांनी त्वरित कारवाई करत संपूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आणि त्यातील चंदनाचा साठा जप्त केला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या चंदनाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असू शकते. या चंदनाची तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारात करण्याचा डाव होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालकासह संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून हे चंदन बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईला पाठवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तस्करी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे. या तस्करीमध्ये मोठे माफिया गट सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Author: Star India News Live
BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या