Mumbai 12/Feb/2025: महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृण हत्या केली आहे.हि घटना लाडच्या मालवणीमध्ये 3 फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे. आरोपी महिलेचे नाव पूजा असे असून, आरोपी प्रियकराचं नाव इम्रान मन्सूरी आहे. राठोडी परिसरात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेने दोन मुलांसमोर पतीला ठार केलं.मयत पावलेला 30 वर्षीय राजेश रोजंदारीवर काम करत होता.
पूजाने आपल्या दोन मुलांसमोर राजेशचा गळा कापून त्याची हत्या केली. यानंतर पूजा आणि मन्सूरने दुचाकीवरुन राजेशचा मृतदेह नेला आणि 500 मीटर अंतरावर एका निर्जनस्थळी फेकून दिला. आपल्यावर संशय येऊ नये यासाठी नंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पूजा आणि मन्सूरी यांच्या प्रेमसंबंध होते. पूजाला आपला पती राजेशसोबत राहण्याची इच्छा नव्हती. यामुळे पूजाला आपला पती राजेशसोबत राहण्याची इच्छा नव्हती. पूजाला मन्सूरीसोबत आपले प्रेमसंबंध कायम ठेवायचे होते.
धक्कादायक म्हणजे मन्सूरी आणि राजेश एकमेकांचे चांगले मित्र होते. पण नात्यात अडथळा ठरत असल्याने मन्सूर आणि पूजा या दोघांनी मिळून राजेशचा काटा काढण्याचा कट रचला व बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी एका सीसीटीव्हीत पूजा, मन्सूरी आणि राजेश एकत्र प्रवास करताना कैद केले. हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी पूजा आणि मन्सूरी यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. आपल्या प्रेमसंबंधांमुळे राजेशची हत्या केली असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.
BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या