Edition

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Pune Criem News : खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या ताब्यात

खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या ताब्यात
खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या ताब्यात

Pune Criem News 18 /May / 2024 : खुणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या ताब्यात.

दिनांक : 17/05/2024 रोजी कै. श्रीनु शंकर विसलावत याचा डहाणूकर कॉलनी येथे काही आज्ञात इसम खून करून पसार झाले होते त्या संदर्भात अलंकार पो स्टे गु. र.न. 86/2024,भा. द.वी.कलम 302, राईट, भारतीय हत्यार कायदा 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक 1, कडील पोलीस नाईक राजेंद्र लांडगे* यांना त्यांच्या बातमी दारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हे दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे या ठिकाणी येणार आहेत सदर बातमीची खातर जमा करून सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी 1) प्रवीण दत्ता कदम* वय 22 वर्ष, रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे.2) गौरव शंकर माने* वय 17 वर्षे, रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे 3) अजय उर्फ सचिन आप्पा जाधव वय 18 वर्षे, रा. लेन नंबर 1, कर्वेनगर वडार वस्ती, रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ, पुणे 4) रोहन कल्याण अडागळे वय 18 वर्षे, लेन नंबर एक कर्वेनगर वडार वस्ती रमेश प्रोविजन स्टोअरच्या जवळ पुणे व 5) अथर्व लक्ष्मण शेळके वय 20 वर्षे, रा.डहाणकर कॉलनी, लक्ष्मी नगर, लेन नंबर 18, कोथरूड, पुणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणामुळे श्रीनु शंकर विसलावत यांचा खून केल्या बाबत कबुली दिली आहे.

सदर आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी कामी त्यांची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह त्यांना पुढील तपास कामी अलंकार पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही,
मा. श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा.श्री. अमोल झेंडे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. सुनील तांबे सो, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, वपोनि श्री क्रांतीकुमार पाटील, खंडणी विरोधी पथक – 1 यांचे मार्गदर्शनाखाली…
खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सपोनि विजयकुमार शिंदे, पो उप निरीक्षक यशवंत ओंबासे, पोहवा सयाजी चव्हाण, अमोल आवाड, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, मयूर भोकरे, मधुकर तुपसुंदर यांनी केली आहे

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool